ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
उत्तर प्रदेशातील प्रयागराज जिल्ह्यातील दयालपूर रेल्वेस्टेशनचे विलक्षण वैशिष्ट्य आहे.
इथे रेल्वे येते, लोक तिकीट घेतात; पण कोणीही रेल्वे प्रवास करत नाही.
साल १९५४ मध्ये या रेल्वेस्टेशनची उभारणी करण्यात आली होती. मात्र, प्रवाशांची संख्या घटल्यामुळे आणि तोट्याचा दाखला देत रेल्वे प्रशासनाने २००६ मध्ये हे स्टेशन बंद केले.
रेल्वेच्या नियमानुसार, जर एखाद्या स्टेशनवर सतत काही काळ ५० पेक्षा कमी तिकीट विकले गेले, तर त्या स्टेशनला बंद केले जाते.
स्टेशन बंद झाल्यानंतर स्थानिकांना याचे महत्त्व उमगले आणि त्यांनी स्टेशन पुन्हा सुरू करण्याची मागणी केली. अखेर २०२० मध्ये दयालपूर स्टेशन पुन्हा सुरू करण्यात आले.
मात्र, रेल्वे पुन्हा ते बंद करू नये म्हणून स्थानिकांनी दररोज तिकीट खरेदी करण्याचा निर्णय घेतला, प्रवास न करता.
आजही येथील स्थानिक दररोज स्टेशनला येतात, तिकीट घेतात आणि पुन्हा घरी परततात.
एकही ट्रेन न पकडता ते रेल्वेची तिकीट विक्री दाखवून स्टेशन चालू ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत.