Parenting Tips : मुलांना ट्यूशनला पाठवत असाल तर 'या' गोष्टींची घ्या खबरदारी, नाहीतर बिघडेल मुलांचे भविष्य

Shreya Maskar

अभ्यासाबाबत गोंधळ निर्माण होतो

जेव्हा मुलाला एकाच कामासाठी शाळा, घर आणि शिकवणी अशा तीन वेगवेगळ्या ठिकाणांहून सूचना मिळतात, तेव्हा त्यांच्या मनात गोंधळ निर्माण होतो. त्यामुळे मुलांना अभ्यासाचे टेन्शन वाढते.

There is confusion about studies | pinterest

अभ्यासाची टाळाटाळ

शाळेत असताना मुलाला वाटते की ते घरी अभ्यास करतील, तर घरी असताना त्यांना वाटते की ते ट्युशनला शिकतील, त्यामुळे मुलं कुठेच नीट लक्ष देत नाही. हळूहळू मुलं अभ्यासाची जबाबदारी पुढे ढकलतात.

Avoidance of study | pinterest

जबाबदारीचे भान राहत नाही

मुल प्रत्येक गोष्टीसाठी कोणावर तरी अवलंबून राहू लागतात, तेव्हा त्यांच्यात स्वतःहून गोष्टी करण्याची जबाबदारीची भावना विकसित होत नाही.

There is no sense of responsibility | pinterest

आत्मविश्वास

मुलाला शिकवणीला पाठवण्याचा सर्वात मोठा परिणाम त्याच्या आत्मविश्वासावर होतो. जेव्हा मुलाला स्वतःहून अभ्यास करण्याची सवय लागत नाही, तेव्हा त्यांच्यातील क्षमतांची त्यांना जाणीव होत नाही, परिणामी आत्मविश्वास हळूहळू कमी होतो.

Confidence | pinterest

मानसिक विकास

मुलांच्या मानसिक विकासावरही परिणाम होतो. मुलं स्वतःच्या डोक्याने आणि मनाने विचार करण्यापेक्षा इतरांवर जास्त अवलंबून राहतात आणि इतरांचे अनुकरण करतात.

Mental development | pinterest

स्वतःसाठी वेळ मिळत नाही

शाळेनंतर क्लासमध्ये जास्त वेळ घालवल्याने मुलांना स्वतःसाठी वेळ मिळत नाही. त्यांना अभ्यासा व्यतिरिक्त इतर छंद जोपासता येत नाही. तसेच इतरांशी संवाद कमी होतो. भावनिक बुद्धिमत्ता आणि संवाद कौशल्ये विकसित करण्यासाठी या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात.

No time for yourself | pinterest

तुलना होते

अनेक क्लासेसमध्ये मुलांच्या परीक्षेतील गुणांनुसार त्यांच्यात तुलना केली जाते, ज्याचा परिणाम मुलांच्या मानसिकतेवर होतो. यामुळे लहान मुलांमध्ये चिंता वाढू शकते आणि त्यांना स्वतःबद्दल न्यूनगंड वाटू शकतो.

was compared | pinterest

पालकांसोबतचे कनेक्शन कमी होते

ट्युशनमध्ये अधिक वेळ घालवल्यामुळे मुलांचे पालकांसोबतचे कनेक्शन कमी होते. परिणामी पालक आणि मुलांत दुरावा येतो. तसेच मुलांना वाईट सवयी देखील लागू शकतात, ज्या विषयी पालकांना काहीच माहित नसते.

Connection with parents decreases | pinterest

NEXT : फक्त महिन्यात मुलांची पर्सनालिटी बदलेल, उन्हाळ्याच्या सुट्टीत शिकवा 'ही' ५ कौशल्ये

Parenting Tips | pinterest
येथे क्लिक करा...