Priya More
लहान मुलं खूप निरागस असतात. मोठी माणसं जसं करतात तसंच अनुकरण लहान मुलं करत असतात.
पालकांनी आपल्या मुलांसमोर व्यवस्थित आणि जबाबदारीने वागणं गरजेचं असतं. कारण मुलंसुद्धा तशीच वागतात.
पालकांनी केलेली छोटीही चूक लहान मुलांच्या भविष्यावर परिणाम करु शकतात. त्यामुळे त्यांनी काळजीपूर्वक वागावे.
पालकांनी आपल्या मुलांसोर सतत भांडणं करु नये. यामुळे मुलांच्या मानसिकतेवर नकारात्मक परिणाम होतो. त्यांचा नात्यावरील विश्वास उडतो.
आई-वडिलांनी आपल्या मुलांसमोर कधीही माराहण करु नये. ते देखील तसे वागू शकतात.
आई-वडिलांनी एकमेकांना मारहाण केली तर त्या मुलांच्या आयुष्यातील वाईट आठवणी बनतात. त्यामुळे मुलांच्या आयुष्यावर परिणाम होऊ शकतो.
पालकांनी प्रत्येक गोष्टीत आपल्या मुलांमध्ये भेदभाव करणाऱ्या गोष्टी बोलू नये. यामुळे मुलांच्या आरोग्यावर परिणाम होतो.
पालकांची भेदभाव करण्याची सवयी मुलांना देखील लागू शकते. भविष्यात ते तसेच वागू शकतात.
पालकांनी आपल्या मुलांना चांगली शिस्त लागावी यासाठी जास्त कठोरपणे वागू नये. यामुळे मुलंही जास्त कठोर वागू लागतात.
पालक आपल्या मुलांशी कठोर वागले तर मुलं चुकीच्या मार्गावर देखील जाऊ शकतात. ते जास्त आक्रमक होऊ शकतात.