Paneer Crispy Recipe: घरच्या घरी झटपट बनवा हॉटेलस्टाईल कुरकुरीत आणि मसालेदार पनीर क्रिस्पी; वाचा रेसिपी

Shruti Vilas Kadam

साहित्य

२५० ग्रॅम पनीर, ३ टेबलस्पून कॉर्नफ्लोअर, २ टेबलस्पून मैदा, १ टीस्पून लाल तिखट, ½ टीस्पून काळी मिरी पूड, १ टीस्पून आले-लसूण पेस्ट, मीठ, तेल, हिरवी मिरची, कांदा, ढोबळी मिरची, सोया सॉस, चिली सॉस आणि टोमॅटो सॉस.

Paneer Crispy Recipe | Saam Tv

पनीर मॅरिनेट करा

एका भांड्यात कॉर्नफ्लोअर, मैदा, आले-लसूण पेस्ट, तिखट, मिरी पूड, मीठ आणि थोडे पाणी घालून घट्ट बॅटर तयार करा. त्यामध्ये पनीरचे चौकोनी तुकडे घालून १५ ते २० मिनिटे मॅरिनेट करा.

Paneer Crispy Recipe

पनीर तळून घ्या

कढईत तेल गरम करून मॅरिनेट केलेले पनीर मध्यम आचेवर सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या. नंतर अतिरिक्त तेल निघण्यासाठी टिश्यू पेपरवर ठेवा.

Paneer Crispy Recipe

मसाला तयार करा

दुसऱ्या पॅनमध्ये थोडे तेल गरम करून त्यात चिरलेला लसूण, हिरवी मिरची, कांदा आणि ढोबळी मिरची परतून घ्या.

Paneer Crispy Recipe

सॉस मिसळा

परतलेल्या भाज्यांमध्ये सोया सॉस, चिली सॉस, टोमॅटो सॉस आणि चिमूटभर मिरी पूड घालून चांगले मिसळा.

Paneer Crispy Recipe

पनीर सॉसमध्ये टॉस करा

तळलेले पनीर सॉसमध्ये घालून हलक्या हाताने टॉस करा, जेणेकरून मसाला प्रत्येक तुकड्यावर समान पसरला जाईल.

Paneer Crispy Recipe

गरमागरम सर्व्ह करा

तयार पनीर क्रिस्पीवर स्प्रिंग अनियन किंवा कोथिंबीर भुरभुरवा. टोमॅटो केचप, चिली गार्लिक सॉस किंवा शेझवान चटणीसोबत गरमागरम सर्व्ह करा.

Paneer Crispy Recipe | Saam Tv

Cardamom Benefits : रोज सकाळी १ वेलची खल्ल्याने शरिराला मिळतील हे ७ जबरदस्त फायदे

Cardamom Benefits
येथे क्लिक करा