साम टिव्ही ब्युरो
आपल्या लूकने आणि किलर फिगरने सगळ्यांना वेड लावणारी पलक तिवारी बॉलिवूडच्या स्टार किड्सपैकी एक आहे.
अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी संपर्कात राहते.
पलकने अलीकडेच 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
आई अभिनेत्री असल्यामुळे तिने पलकला याच क्षेत्रात करिअर करण्याचा सल्ला दिला असावा, असं बऱ्याच लोकांना वाटतं.
यावरच आता स्वतः पलकने खुलासा केला आहे.
पलक तिवारी नुकतीच पेटा इव्हेंटमध्ये दिसली.
'माझ्या आईला नेहमीच माहित होतं की, मला अभिनेत्री व्हायचं आहे. ती एक प्रतिभावान अभिनेत्री आहे.'
'मला नेहमी वाटलं आहे की, माझ्यात ती गोष्ट, जी एका अभिनेत्रीमध्ये असायला हवी. म्हणूनच या व्यवसायात सामील होण्याची माझी इच्छा होती.'