Dhanshri Shintre
ऑक्सिडाइज्ड दागिने स्वच्छ करण्यासाठी त्यांना गरम पाण्यात एक चमचा बेकिंग सोडा टाकून सुमारे १० मिनिटे भिजत ठेवा.
ऑक्सिडाइज्ड दागिने स्वच्छ करण्यासाठी त्यांना १५ मिनिटे व्हिनेगरमध्ये भिजवून ठेवा आणि नंतर स्वच्छ पाण्याने धुवा.
ऑक्सिडाइज्ड दागिन्यांवर पांढरी टूथपेस्ट लावा, मग मऊ कापडाने हळूवार चोळून स्वच्छ करा आणि नंतर पाण्याने धुवा.
एखाद्या खोल भांड्याच्या तळाशी अॅल्युमिनियम फॉइल अंथरून व्यवस्थित पसरवा, जेणेकरून दागिने ठेवताना ते पूर्णपणे झाकले जातील.
दागिने स्वच्छ केल्यावर त्यांना नीट पुसून पूर्णपणे वाळू द्या आणि मगच हवाबंद कंटेनरमध्ये सुरक्षितपणे ठेवा.
ऑक्सिडाइज्ड दागिन्यांचा रंग टिकवण्यासाठी त्यांना परफ्यूम, लोशन किंवा कोणत्याही केमिकलयुक्त उत्पादनांपासून दूर ठेवणे आवश्यक आहे.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.