Manasvi Choudhary
कोरफड हे औषधी गुणधर्म आहे. केसांपासून ते त्वचेपर्यंतच्या सर्व समस्यांवर कोरफड फायदेशीर आहे.
चेहऱ्याला कोरफड लावण्याचे अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. हिवाळ्यात चेहऱ्याला कोरफड लावल्याने नेमका काय फायदा होतो हे जाणून घेऊया.
हिवाळ्यात थंड हवेमुळे त्वचा कोरडी होते अशावेळी त्वचेवरील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी त्वचेवर कोरफड लावा.
कोरफडमध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात यामुळे चेहऱ्यावरील सूज, लालसरपणा कमी होऊ शकतो.
कोरफडमध्ये अँटी- ऑक्सि़डन्ट्स असतात जे त्वचेतील कोलेजन निर्माण वाढवतात आणि त्वचा तरूण राहते.
कोरफड चेहऱ्यावरून तेल शोषून घेते यामुळे मुरूमांची समस्या कमी होऊ शकते त्वचा स्वच्छ होते.
त्वचेसोबत केसांना देखील कोरफड लावण्याचे फायदे आहेत केस मऊ आणि चमकदार होतात.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.