Shruti Kadam
सतत मनात विचारांचे वादळ सुरू राहणे, कोणत्याही गोष्टीचा अनावश्यक खोल विचार करणे हे मानसिक थकवा, चिंता आणि निर्णय घेण्यात अडचणी निर्माण करते.
यावर नियंत्रण ठेवण्यासाठी काही सोप्या टिप्स वापरता येऊ शकतात.
अति विचाराचे मुख्य कारण म्हणजे भूतकाळातील घटना किंवा भविष्यातील शक्यता याबद्दल चिंता करणे. त्यावर उपाय म्हणजे "present moment" म्हणजे वर्तमानात राहण्याचा सराव करणे.
जेव्हा तुम्ही कोणत्याही गोष्टीवर खूप विचार करता, तेव्हा स्वतःला थांबवून विचार करा – "हा विचार उपयोगी आहे का?" "याचा काही परिणाम होणार आहे का?" असे विचार केल्याने तुम्ही स्वतःच अति विचारातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करू शकता.
अति विचार करणारे लोक अनेकदा सर्व गोष्टी मनातच साठवून ठेवतात. त्याऐवजी ते विचार लिहून काढा किंवा कोणासोबत मोकळेपणाने बोला – जसे की जवळचा मित्र, कुटुंबीय किंवा समुपदेशक.
कधी कधी अति विचार करण्यामागचं कारण म्हणजे एखादा निर्णय घेण्याची भीती. परंतु, प्रत्येक निर्णय पूर्णपणे योग्य असेलच, असं नाही. चुका झाल्यास त्यातून शिकण्याचा दृष्टिकोन ठेवावा. आत्मविश्वासाने निर्णय घ्या आणि त्यावर ठाम राहा.
अति विचार ही अनेकदा मानसिक थकव्याची निशाणी असते. त्यामुळे दररोज काही वेळ स्वतःसाठी ठेवा – जसे की एखादी आवडती गोष्ट करणे, संगीत ऐकणे, चालायला जाणे, किंवा फक्त विश्रांती घेणे.