OTT Released This Week: विकेंड ठरणार खास! ओटीटीवर पाहा तुमच्या आवडते वेबसीरिज आणि चित्रपट

Chetan Bodke

वेगवेगळ्या धाटणीचे वेबसीरिज आणि चित्रपट

ओटीटीवर या आठवड्यात अनेक वेबसीरिज आणि चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. यामध्ये प्रेक्षकांना वेगवेगळ्या धाटणीचे कलाकृती पाहायला मिळणार आहे.

OTT Released This Week | Saam Tv

Bramayugam- ब्रमयुगम

'ब्रमयुगम' चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत मामुट्टीसह अनेक स्टार प्रमुख भूमिकेत आहेत. हा चित्रपट येत्या १५ मार्च रोजी 'सोनी लिव्ह' या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.

Bramayugam Film | Saam Tv

Lal Salaam- लाल सलाम

ऐश्वर्या रजनीकांत दिग्दर्शित 'लाल सलाम' चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत रजनीकांतसह अनेक स्टार प्रमुख भूमिकेत आहेत. हा चित्रपट येत्या १५ मार्च रोजी 'नेटफ्लिक्स'वर रिलीज होणार आहे.

Lal Salaam | Saam Tv

Lover- लव्हर

अरूण आणि दिव्या नावाच्या कपल भोवती 'लव्हर'ची स्टोरी आहे. चित्रपटात मुख्य भूमिकेत के. मणिकंदन, श्री गौरी प्रिया, कन्ना रवी आणि हरीश कुमार अशी स्टार कास्ट आहे. हा चित्रपट येत्या १५ मार्चला डिस्ने+ हॉटस्टारवर रिलीज होणार आहे.

Lover | Saam Tv

Murder Mubarak- मर्डर मुबारक

'मर्डर मुबारक' मध्ये सारा अली खान, पंकज त्रिपाठी आणि करिश्मा कपूरसह अनेक स्टार प्रमुख भूमिकेत आहेत. चित्रपट येत्या १५ मार्चला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

Murder Mubarak | Saam Tv

Hanuman- हनुमान

तेजा सज्जा स्टारर आणि प्रशांत वर्मा दिग्दर्शित 'हनुमान' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली. अंजनदारी या काल्पनिक गावावर आधारित चित्रपटाचे कथानक आहे. हा चित्रपट येत्या १६ मार्चला झी५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

Hanuman | Saam Tv

Big Girls Don't Cry- बिग गर्ल्स डोन्ट क्राय

'बिग गर्ल्स डोन्ट क्राय' या वेबसीरिजची कथा बोर्डिंग स्कूलमध्ये राहणाऱ्या तरूणींवर आधारित आहे. ही सीरीज मल्टीस्टारर आहे. ही वेबसीरीज येत्या १४ मार्च रोजी ॲमेझॉन प्राईम व्हिडीओवर रिलीज होणार आहे.

Big Girls Don't Cry | Saam Tv

Main Atal Hoo- मैं अटल हूं

भारताचे स्वर्गीय माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित 'मैं अटल हूं' हा चित्रपट आहे. स्वर्गीय माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे पात्र अभिनेता पंकज त्रिपाठीने साकारले. चित्रपट येत्या १४ मार्चला झी५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

Main Atal Hoo | Saam Tv

NEXT: वयाच्या ४४ व्या वर्षी चाहत्यांना लावलंय याड; मराठमोळ्या श्वेताचं फोटोशूट चर्चेत

Shweta Shinde Photos | Instagram/ @shwetashinde_official