eSIM Scam: सावधान! एक चूक अन् फ्रॉड करणाऱ्यांना मिळतोय तुमचा OTP; सरकारने दिली वॉर्निंग

Dhanshri Shintre

eSIM फसवणुक

इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटरने (I4C) eSIM फसवणुकीबाबत अलर्ट दिला. अशा घोटाळ्यांत अनेक लोकांना लक्ष्य केले जात असून सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

माहिती व मार्गदर्शन

सरकारने २०२० मध्ये स्थापन केलेले I4C हे केंद्र नागरिकांना सायबर गुन्ह्यांविषयी जागरूक करते आणि ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी आवश्यक माहिती व मार्गदर्शन उपलब्ध करून देते.

फसवणुकीवर अलर्ट

आय4सीने ईसिम फसवणुकीवर अलर्ट दिला आहे. एजन्सीनुसार, एटीएम व यूपीआय सेवा बंद असतानाही फसवणूक करून वापरकर्त्याच्या खात्यातून ४ लाख रुपये काढले गेले.

मोबाईलवर हल्ला

या फसवणुकीत हॅकर्सनी थेट यूजर्सच्या मोबाईलवर हल्ला केला. त्यामुळे त्यांना फोनवर आलेल्या OTP वर नियंत्रण मिळाले आणि खात्यातून पैसे काढले गेले.

स्कॅमर लिंक पाठवतात

I4C च्या माहितीनुसार, स्कॅमर आधी पीडितेला फोन करतात व eSIM सक्रियतेसाठी लिंक पाठवतात. त्या लिंकवर क्लिक करताच व्यक्ती थेट फसवणूक जाळ्यात सापडतो.

फिजिकल सिम

ही लिंक प्रत्यक्षात फिजिकल सिम eSIM मध्ये बदलण्यासाठी असते. लिंक स्वीकारताच तुमचे फिजिकल सिम निष्क्रिय होते आणि फसवणूक करणाऱ्यांना फोनवर नियंत्रण मिळते.

कॉल व OTP

यानंतर स्कॅमर्सना यूजर्सच्या मोबाईलवर येणारे कॉल व OTP मिळू लागतात. या माहितीचा गैरवापर करून ते सहजपणे बँक खात्याला प्रवेश मिळवतात आणि पैसे काढतात.

नागरिकांना आवाहन

फसवणूक रोखण्यासाठी I4C ने मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. अनोळखी नंबरवरून आलेल्या कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका, असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.

बँकेशी संपर्क साधा

अशी फसवणूक झाल्यास विलंब न करता त्वरित आपल्या बँकेशी तसेच टेलिकॉम सेवा प्रदात्याशी संपर्क साधावा, अशी सूचना अधिकाऱ्यांनी नागरिकांना दिली आहे.

NEXT: iPhone 16 Proवर मिळत आहे धमाकेदार डिस्काउंट, आता कमीत कमी किमतीत उपलब्ध

येथे क्लिक करा