साम टिव्ही ब्युरो
अर्धवट-अपूर्ण ज्ञानासोबत कधीही पुढे चालू नये. असे केल्यास तुम्हाला वाटेल की तुम्ही ज्ञानी आहात आणि शेवटपर्यंत अज्ञानी राहाल.
केवळ तुमचे पापच तुम्हाला दुःखी करू शकतात. जे तुम्हाला तुमच्यापासून दूर नेण्याचा प्रयत्न करतात अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करणे चांगले राहते.
त्रास तुम्हाला दुःख देण्यासाठी नाहीये. लोक हीच चूक करतात. हा त्रास तुम्हाला अधिक सतर्क करतो. लोक तेंव्हाच सतर्क होतात जेव्हा बाण त्यांच्या हृदयावर खोलवर आघात करतो.
कोणासोबतही कोणत्याही प्रकारच्या स्पर्धेची आवश्यकता नाही. तुम्ही स्वतःच श्रेष्ठ आहेत आणि जसे आहेत तसेच पूर्णपणे चांगले आहात. स्वतःचा स्वतःच स्वीकार करा.
दुःखावर लक्ष केंद्रित केल्यास नेहमी दुःखी राहाल. सुखाकडे लक्ष देणे सुरु करा. आपण ज्या गोष्टीकडे लक्ष देतो तीच जास्त सक्रिय होते. ध्यान सर्वात मोठी शक्ती आहे.
तुम्ही कोणावर प्रेम करता, कुठे प्रेम करता, का प्रेम करता, केव्हा प्रेम करता, कसे प्रेम करता आणि कशासाठी प्रेम करता याला काहीच महत्त्व नाही कारण तुम्ही प्रेम करत आहात हेच पुरेसे आहे.
प्रेम एक पक्षी असून याला स्वतंत्र राहणे आवडते. ज्याला उडण्यासाठी संपूर्ण आकाश लागते.
या जगात मैत्रीच खरं प्रेम आहे. मैत्रीची भावना प्रेमाचे सर्वोच्च रूप आहे. जेथे काहीही मागितले जात नाही, कोणतीही अट नसते फक्त दिले जाते.