Taj Mahal: कोणाच्या जमिनीवर बांधला गेल्या ताजमहाल? पाहा कोण होते जमिनीचे मालक?

Surabhi Jayashree Jagdish

ताजमहाल

ताजमहालाबाबत अनेक गोष्टी आणि ऐतिहासिक नोंदी आढळतात. ताजमहाल कोणाच्या जमिनीवर बांधला गेला याबद्दलही लोकांमध्ये उत्सुकता आहे.

इतिहासकारांची नोंदी

इतिहासकारांच्या नोंदींनुसार, ही जमीन मुघल बादशहा शाहजहानने खासगी मालकाकडून खरेदी करून ताजमहालाचे बांधकाम सुरू केले होते.

ताजमहालाची जमीन

इतिहासकारांच्या नोंदींनुसार ताजमहाल ज्या जागेवर उभा आहे ती जमीन आगऱ्यातील राजा जयसिंह यांच्याकडे होती. ते आमेरच्या कछवाहा राजघराण्यातील होते. मुघल साम्राज्यात त्यांचा मोठा मान होता.

जमीन अधिकृतरित्या खरेदी केली

ताजमहाल बांधण्यासाठी शाहजहानने ही जमीन जयसिंह यांच्याकडून अधिकृतरित्या घेतली होती. अनेक दस्तऐवजांत त्याचा उल्लेख आहे. मुघल परंपरेप्रमाणे बांधकामासाठी जमिनीची खरेदी ही प्रक्रिया महत्त्वाची होती.

दुसरी जमीन दिली

ही जमीन पैसे देऊन नाही तर त्या बदल्यात दुसरी जमिन देण्यात आली असल्याचे दाखले मिळतात. जयसिंह यांना आगरा शहरात दुसरी जमीन देण्यात आली होती. त्याकाळी जमीन बदलण्याची ही पद्धत सामान्य होती.

गुलाब बाग

ज्या जागेवर आज ताजमहाल आहे, त्या जागेवर आधी 'गुलाब बाग' किंवा बागायती क्षेत्र होतं. जयसिंह यांनी या बागेचं मॅनेजमेंट केलं होतं. जमीन सुपीक असल्याने ही राजेशाही बाग होती.

बांधकाम

जमीन हक्काने मिळाल्यानंतर शाहजहानने उस्ताद अहमद लाहौरी यांना अंतिम नकाशा तयार करण्याचे काम दिले. यानंतर ताजमहालाचे बांधकाम अधिक वेगाने सुरू झाले. जमिनीचा उतार आणि यमुनेच्या काठीचा फायदा यासाठी घेतला गेला.

४० एकर परिसर

फक्त मुख्य इमारत नव्हे तर संपूर्ण कंपाऊंडसाठी जवळपास ४० एकर परिसर बादशहाने खरेदी केला होता. यामध्ये मशिद, अतिथीगृह, बाग, दरवाजे आणि नदीकाठचा बांध समाविष्ट होता.

Borivali Tourism: थंडीच्या दिवसात बाहेर भटकायला जायचंय? लांब न जाता बोरिवलीच्या या ठिकाणी फिरून या

येथे क्लिक करा