Manasvi Choudhary
भारतात पारंपारिक वस्त्रामध्ये साडीला विशेष महत्व आहे.
साडी म्हणजेच स्त्रियाच्या आवडीचा पोशाख
साड्यांच्या विविधतेमुळे प्रत्येक स्त्रिला साड्यांचे आकर्षण असते.
मात्र फार दिवस झाले तरी या साड्या कपाटातून काढून टाकणं स्त्रियांच्या जीवावर येतं अशावेळी साड्यांना मॉर्डन लूक कसा द्यायचा ते पाहूया
जुन्या काठापदरच्या साड्यांचे नवा लूक देऊन तुम्ही या प्रकारे पारंपारिक गाऊन शिवू शकता.
सिल्क साडी प्रत्येक स्त्रीकडे असते या साडीचा ब्लाऊज आणि परकर अशा पध्दतीने स्टायलिश दिसेल असा लेहेंगा चोली शिवा.
रंगीबेरंगी साड्या असतील त्यांचे कलरफुल स्कर्ट शिवू शकता जे तुम्ही कधीही कोणत्याही टॉपवर परिधान करू शकता.
डिझाईनर साड्या असल्यास तुम्ही स्टायलिश अंदाजात छातीपासून कमरेपर्यंत फिटींग नंतर फ्लोरल असा लाँग गाऊन शिवू शकता ज्याने तुमचा लूक हटके दिसेल
सिल्क डिझायनर साडीपासून तुम्ही पार्टिवेअर बॅकलेस शॉर्ट गाऊन ट्राय करू शकता ज्याने तुमचा लूक मॉर्डन दिसेल.