Chandrakant Jagtap
UAE मधील इंटरनॅशनल इंडियन फिल्म अॅकॅडमीमध्ये अनेक सेलेब्रिटिंनी उपस्थितांचं लक्ष वेधलं.
यावेळी ग्रीन कार्पेटवर सलमान खाननंतर नोरा फतेही होती जिने तिच्या हॉट लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
लाल बॉडीकॉन गाऊन परिधान केलेली नोरा आयफामध्ये ग्रीन कार्पेटवर चालत असताना खूपच सुंदर आणि आकर्षक दिसत होती.
नोराने सॉफ्ट कर्ल्स आणि हलक्या मेकअपसह तिचा लूक पूर्ण केला. नेकलाइन असलेल्या लेटेक्स ड्रेसने तिच्या मादक अवतारात आणखी भर घातली.
नोराच्या लूकने इंटरनेटवर दोन गट बनले आहेत. तिच्या काही चाहत्यांच्या वाटतेय की ती 'स्मोकिंग' हॉट दिसतेय.
काही यूजर्संनी किम कार्दशियन बनण्याचा प्रयत्न केला म्हणत नोराला चालण्याची शैलीवरून ट्रोल केले.
एका यूजरने लिहिले की, "ती किम कार्दशियन सारखी दिसण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे"
दुसऱ्या एका युजरने लिहिले की “तिला वाटते की ती किम कार्दशियनसारखी दिसते, पण ती तशी नाही.”
नोरा ही उत्तम अभिनेत्री आणि डान्सर आहे. खूप कमी कालावधीत तिने बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण केलं आहे.