Manasvi Choudhary
न्यूडल्स, मॅगी, हे चायनीज पदार्थ खायला सर्वांनाच आवडतात. बाजारात न्यूडल्सचे अनेक पदार्थ मिळतात.
तुम्ही देखील घरच्या घरी न्यूडल्स फ्रँकी बनवू शकता. न्यूडल्स फ्रँकी घरी करण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.
न्यूडल्स फ्रँकी बनवण्यासाठी न्यूडल्स, मीठ, मिरची पावडर, धणे- जिरे पावडर, हळद पावडर, गूळ, तेल, मक्याचे दाणे, गहू पीठ, कोथिंबीर हे साहित्य घ्या.
न्यूडल फ्रँकी बनवण्यासाठी सर्वप्रथम न्यूडल्स आणि मका दाणे भिजत घालावे नंतर कुकरमध्ये न्यूडल्स शिजवून घ्यायचे आहेत.
न्यूडल्स शिजवून झाल्यानंतर त्यात मीठ घालून ते कोरडे करा. गॅसवर कढईमध्ये गरम तेलामध्ये मोहरी- जिरे याची फोडणी द्यायची आहे.
मिश्रणात सर्व भाज्या घालून त्यात हळद, मिरची पूड, धणे, जिरे पावडर घालून व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे.
मैदाची गोलाकार चपाती तयार करायची नंतर त्यात तयार केलेली न्यूडल्सचे स्टफिंग मिक्स करून चपाती दुमडून घ्यायची आहे.
गॅसवर तव्यावर फ्रँकी तूप लावून फिरवून घ्यायची आहे. अशाप्रकारे सर्व्हसाठी न्यूडल्स फ्रँकी तयार असणार आहे.