Shruti Vilas Kadam
पावसामुळे ओलसर हवामानात त्वचेला घाम आणि ओलावा येतो. अशावेळी चेहरा माइल्ड फेसवॉशने किंवा वेट वाइप्सने स्वच्छ करा.
चिकटपणा कमी करण्यासाठी मॅटिफायिंग फेस पावडर किंवा ब्लॉटिंग पेपर वापरा. हे त्वचेवरचे तेल शोषून घेतात.
मेकअपला सेट ठेवण्यासाठी आणि ओलाव्यापासून वाचवण्यासाठी मेकअप फिक्सिंग स्प्रे शिंपडा.
पावसाळ्यात हेवी फाउंडेशन किंवा क्रीमी प्रोडक्ट्स टाळा. त्याऐवजी BB क्रीम, टिंटेड मॉइश्चरायझर वापरा.
काजळ, मस्कारा, लिपस्टिक हे वॉटरप्रूफ असले पाहिजे. त्यामुळे पावसातसुद्धा मेकअप टिकतो.
ओलसर हवामानात जास्त हायलायटर वापरल्यास त्वचा अजूनच चमकदार व चिकट दिसते. नैसर्गिक लूकसाठी कमीत कमी प्रोडक्ट वापरा.
हाताने चेहरा पुसल्याने मेकअप पसरतो आणि त्वचेला इन्फेक्शन होऊ शकते. त्याऐवजी टिशू किंवा सॉफ्ट कापड वापरा.