Surabhi Jayashree Jagdish
पावसाळ्यात डोंगर, तलाव, धबधबे आणि हिरवाईचे सौंदर्य अधिक खुलून दिसतं. त्यामुळे अनेक ठिकाणी निसर्गाचा आनंद घेता येतो. आठवड्याच्या शेवटी किंवा एका दिवसाच्या सुट्टीत अशी सहल फ्रेश करणारी ठरते.
प्रवासाला निघण्यापूर्वी हवामानाचा अंदाज तपासणं आवश्यक आहे. रेनकोट, छत्री, अतिरिक्त कपडे आणि आवश्यक औषधं सोबत ठेवावीत. धोकादायक ठिकाणी सेल्फी घेणं किंवा पाण्याच्या वेगवान प्रवाहात उतरणं टाळावं.
ऑफिसला एकच दिवस सुट्टी असल्याने अनेकजण जवळ फिरायला जायचा प्लान करतात. आज आम्ही तुम्हाला वनडे पिकनीकसाठी कुठे जाऊ शकतात ते सांगणार आहोत. कांदिवली जवळ काही ठिकाणं आहेत जिथे तुम्ही एका दिवसात फिरून येऊ शकता.
कांदिवलीपासून अवघ्या काही किलोमीटरवर असलेलं हे उद्यान पावसाळ्यात हिरवाईने नटलेलं दिसतं. याठिकाणी निसर्गरम्य पायवाटा, विविध पक्षी आणि समृद्ध जैवविविधतेचा अनुभव घेता येतो. सकाळी किंवा दुपारच्या वेळेत कुटुंबासह एक दिवसाच्या सहलीसाठी हे उत्तम ठिकाण आहे.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरात असलेल्या या प्राचीन बौद्ध लेण्या सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीच्या मानल्या जातात. पावसाळ्यात लेण्यांच्या परिसरात हिरवळ पाहायला मिळते. इतिहास, निसर्ग आणि ट्रेकिंगची आवड असलेल्या पर्यटकांसाठी हे आकर्षणाचं ठिकाण आहे.
कांदिवलीहून जवळ असलेले आरेटं जंगल शांत वातावरणासाठी प्रसिद्ध आहे. पावसाळ्यात याठिकाणी झाडांची दाट हिरवळ आणि थंडावा अनुभवायला मिळतो. सकाळच्या फेरफटक्यासाठी, फोटोग्राफीसाठी आणि छोट्या कौटुंबिक सहलीसाठी हे योग्य ठिकाण आहे.
कांदिवलीहून गोराईपर्यंत रस्ता किंवा फेरी बोटच्या माध्यमातून सहज पोहोचता येते. संध्याकाळचा सूर्यास्त, समुद्रकिनाऱ्यावरील फेरफटका आणि स्थानिक खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी हे लोकप्रिय ठिकाण आहे.