Shruti Vilas Kadam
नो मेकअप लूकसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हेल्दी त्वचा. सौम्य फेसवॉशने चेहरा स्वच्छ करा, टोनर लावा आणि हलका मॉइश्चरायझर वापरा. हायड्रेटेड त्वचा नैसर्गिक ग्लो देते.
जड मेकअप न करता पोर्स स्मूथ दिसण्यासाठी जेल बेस्ड किंवा मॅट प्रायमर लावा. यामुळे चेहरा फ्रेश आणि नॅचरल दिसतो.
नो मेकअप लूकसाठी फाउंडेशन टाळा. स्किन टोनप्रमाणे बीबी क्रीम किंवा सीसी क्रीम वापरल्यास चेहरा नैसर्गिक आणि स्वच्छ दिसतो.
डोळ्यांखालील काळेपणा, डाग किंवा पिंपल्स असतील तरच कन्सीलर लावा. जास्त कन्सीलर लावल्यास मेकअप दिसू लागतो.
भुवया जास्त डार्क न करता हलक्या हाताने ब्राऊ पेंसिल किंवा ब्राऊ जेल वापरा. यामुळे चेहऱ्याला नैसर्गिक शेप मिळतो.
फक्त मस्कारा किंवा ब्राउन काजळ वापरा. गालांसाठी क्रीम ब्लश किंवा लिप टिंट लावल्यास फ्रेश आणि गुलाबी लूक मिळतो.
लिपस्टिकऐवजी लिप बाम, न्यूड पिंक किंवा पीच शेड वापरा. ओठ हेल्दी आणि नैसर्गिक दिसतात.