Shraddha Thik
नवीन वर्ष प्रत्येकासाठी आशेचा किरण घेऊन येत असतं. नवीन वर्षानिमित्त लोक त्यांच्या जीवनात बदल करण्यासाठी अनेक संकल्प ठरवतात.
या सवयी तुम्हाला नवीन वर्षात निरोगी राहण्यास मदत करतील. येत्या वर्षभरात तुम्हालाही निरोगी राहण्यासाठी तुमच्या काही सवयी बदलायच्या असतील, तर हे नक्की वाचा.
आजकाल लोकांच्या झोपण्याच्या आणि खाण्याच्या वेळा पूर्णपणे बदलल्या आहेत. बरेच लोकं रात्री उशिरा जेवतात आणि झोपायला बराच उशीर होतो. अशा स्थितीत हे देखील आजारांचे मोठे कारण बनू शकते.
त्यामुळे सर्वप्रथम सर्व कामे वेळेवर करण्याची सवय लावा. लवकर जेवा आणि लवकर झोपा. कमीत कमी 8 तासांची झोप घ्या.
आजच्या काळात, प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या कारणाने चिंतित किंवा स्ट्रेसमध्ये असतो. पण काही लोकांना जास्तच काळजी करण्याची सवय असते. त्यामुळे मानसिक आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात.
तुमचा स्ट्रेस मॅनेज करण्यासाठी, तुम्ही ध्यान आणि माइंडफुलनेस यासारख्या स्ट्रेस मॅनेजमेंट तंत्रांचा अवलंब केला पाहिजे.
शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहण्यासाठी शरीर सक्रिय ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी रोज व्यायाम करण्याची सवय लावावी. यासाठी तुम्ही मॉर्निंग वॉक, व्यायाम, योग किंवा डान्स क्लास यासारखे उपक्रम करू शकता. व्यायामाने शरीरा आणि मन दोन्ही तंदुरुस्त राहते.
आजकाल लहान मुले असो वा तरुण, जंक फूड आणि पॅक फूड खाणे सर्वांनाच आवडते. पण ते आपल्या आरोग्यासाठी अतिशय हानिकारक ठरू शकते. त्यामुळे या नवीन वर्षापासून घरचे बनवलेले अन्न आणि सकस अन्न खाण्याची सवय लावा.