New Parliament Building Photos: देशाचे नवीन संसद भवन आहे खूपच आलिशान, इनसाइड फोटो पाहून व्हाल चकित

Priya More

देशाचे नवीन संसद भवन

देशाला आज नवीन संसद भवन मिळाले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या संसद भवनाचे उद्घाटन करण्यात आले.

New Parliament Building | Social Media

इतर संसद भवन पडतात फिके

लोकशाहीचे प्रतीक असलेले हे संसद भवन इतके भव्य आहे की यापुढे परदेशातील संसदही फिके पडतात.

New Parliament Building | Social Media

आलिशान इमारत

नवीन संसद भवनाची भव्यता तुम्हाला मोहित करेल. या संसद भवनाची इमारत खूपच आलिशान आहे.

New Parliament Building | Social Media

अशी आहे आसनव्यवस्था

नव्या संसद भवनाच्या इमारतीत 1,272 खासदारांची आसनव्यवस्था असलेल्या लोकसभा सभागृहात संयुक्त अधिवेशन होणार आहे.

New Parliament Building | Social Media

इतक्या जागेत बांधील इमारत

संसद भवनाची ही इमारत चार मजली आहे. संसद भवनाची नवीन इमारत सुमारे 65,000 चौरस मीटरमध्ये बांधण्यात आली आहे.

New Parliament Building | Social Media

संसदेला 3 दरवाजे

नवीन संसदेला 3 दरवाजे आहेत. त्यांना ज्ञानद्वार, शक्तीद्वार आणि कर्मद्वार अशी नावे देण्यात आली आहेत.

New Parliament Building | Social Media

इतके कोटी रुपये खर्च

लोकशाहीचे प्रतीक असलेले नवीन संसद भवन तयार करण्यासाठी 862 कोटी रुपये खर्च करण्यात आले.

New Parliament Building | Social Media

120 कार्यालय

नवीन संसद भवनात एकूण 120 कार्यालये आहेत. यामध्ये कॅफे आणि जेवणाचे क्षेत्रही हायटेक आहे.

New Parliament Building | Social Media

हे आहेत डिझायनर

संसदेच्या नवीन इमारतीचे डिझाईन एचसीपी डिझाईन या गुजरातमधील आर्किटेक्चर फर्मने केले आहे. तर बांधकाम टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेडने केले आहे.

New Parliament Building | Social Media

NEXT: Health Tips: रात्रीच्या जेवणात चपाती का खाऊ नये?

Health Tips | Saam Tv