Morning Motivation: नवीन दिवस, नवी आशा! हे १० सुविचार, जे तुमचं जीवन बदलू शकतात

Dhanshri Shintre

सत्य

सत्य बोलणाऱ्याचे मन शांत असते. कारण तो परिणामांची भीती बाळगत नाही. सत्य कधीच हरत नाही, शेवटी विजय त्याचाच होतो.

आपुलकी

आपुलकीने जीवन फुलते, फुलांनी बाग खुलते, हास्याने चेहरा उजळतो आणि मनापासून जपलेली नातीच आयुष्यात सुंदर आठवणी निर्माण करतात.

अंधार

धुक्याप्रमाणे जीवनातही अंधार असतो. पुढचं स्पष्ट न दिसलं तरी, एकेक पाऊल टाकत राहा, मागचं हळूहळू स्पष्ट होत जातो.

साधेपणा

साधेपणा हा कुणाचाही दुर्बलपणा नसतो, तो त्याच्या उत्तम संस्कारांची आणि सुसंस्कृततेची खूण असतो, जे नेहमी आदरास पात्र ठरते.

संघर्ष

सिंहासारखी ताकद असूनही यशासाठी संघर्ष करावा लागतो, कारण केवळ गर्जना करून नाही, तर कृतीनेच या जगात आपलं स्थान निर्माण करता येतं.

बळ

उड्डाणासाठी बळ मिळाल्यावर आभाळ गाठा, पण ज्यांनी आधार दिला, जिथे जीवनाला सुरुवात झाली ते घरटं सदैव मनात ठेवावं, विसरू नये.

विजय

सत्याच्या विजयाला वेळ लागतो, पण ते कायमच अढळ असतं. क्षणिक अडचणी आल्या तरी शेवटी जिंकणं हे सत्याचं नशिबात असतं.

NEXT:  यशाच्या शिखरावर पोहोचायचंय? मग 'हे' प्रेरणादायी विचार वाचाच

येथे क्लिक करा