Manasvi Choudhary
वास्तुशास्त्रात, घरातील वस्तूच्या मांडणीविषयी नियम सांगितले आहेत. घर व्यवस्थित ठेवण्यासाठी तसेच जागा कमी असल्यामुळे अनेकजण बेडच्या खाली वस्तू ठेवतात.
जागा कमी असली म्हणून तुम्ही अनेक वस्तू बेड खाली ठेवत असाल तरी वास्तूशास्त्रानुसार, बेडखाली काही वस्तू ठेवणे अत्यंत अशुभ मानले जाते. बेड खाली कोणत्या 5 वस्तू ठेवू नये हे या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
अनेक बेडखाली जुन्या चपला, बूट्स ठेवतात. मात्र वास्तूनुसार, पादत्राणे ही बाहेरची घाण आणि नकारात्मक ऊर्जा घेऊन येतात यामुळे बेडखाली ठेवणे टाळावे.
बेडखाली सुरी, चाकू, लोखंडी अवजारे व धारदार शस्त्रे ठेवू नयेत. वास्तूनुसार या गोष्टी नकारात्मक ऊर्जेला आकर्षित करतात.
जुने फाटलेले कपडे, जुन्या गोधड्या बेडखाली ठेवतो. यामुळे घरात निगेटिव्ह एनर्जी वाढते
जुने मोबाईल, खराब झालेली चार्जर्स, इलेक्ट्रीक वायर किंवा इतर कोणतीही बंद पडलेली इलेक्ट्रॉनिक उपकरणे बेडखाली ठेवणे टाळावे.
अनेक लोक जागेअभावी देवाच्या तुटलेल्या मूर्ती किंवा पूर्वजांचे फोटो बेडच्या खाली ठेवतात हे ठेवू नये.
येथे दिलेली महिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.