Surabhi Jayashree Jagdish
नाश्त्यामध्ये अंडे हा सर्वाधिक खाल्ला जाणारा पदार्थ आहे आणि लोक तो मोठ्या आवडीने खातात. अंडे हे प्रोटीनचे उत्तम स्रोत मानले जाते आणि म्हणूनच फिटनेसप्रेमी लोक आपल्या आहारात त्याचा समावेश करतात.
अंडे खाल्ल्याने मसल्सची वाढ होते, मेंदूचे आरोग्य सुधारते आणि डोळ्यांसाठीही ते फायदेशीर ठरते. याशिवाय अंडे खाल्ल्याने कोलेस्टेरॉलची पातळी संतुलित राहते.
फायदेशीर असलेले अंडे जर काही विशिष्ट पाच पदार्थांसोबत खाल्ले, तर ते आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे या पदार्थांसोबत अंडे कधीही खाऊ नये. अन्यथा त्याचे दुष्परिणाम शरीरावर दिसू शकतात.
सोयामध्ये ट्रिप्सिन इन्हिबिटर नावाचा घटक असतो जो अंड्यातील प्रोटीन शोषून घेत नाही. यामुळे गॅस, पोट फुगणे आणि अस्वस्थता यांसारख्या समस्या होऊ शकतात.
विशेषतः कच्च्या अंड्यात साखर मिसळल्यास ग्लायकेशन रिअॅक्शन होऊ शकते. याचा थेट परिणाम यकृतावर होतो. दीर्घकाळ असे केल्यास पचनक्रिया मंदावू शकते.
अंडे खाल्ल्यानंतर लगेच चहा प्यायल्यास त्यातील लोह आणि प्रोटीन शरीरात नीट शोषलं जात नाही. यामुळे शरीरात अशक्तपणा येऊ शकते. तसेच लोहाच्या कमतरतेची समस्या वाढू शकते.
मांस आणि अंडे हे दोन्ही प्रोटीनयुक्त पदार्थ आहेत. हे एकत्र खाल्ल्यास पचनसंस्थेवर जास्त ताण येतो. त्यामुळे अॅसिडिटी, गॅस, पोटदुखी आणि कोलेस्टेरॉल वाढण्याची शक्यता असते.
अंडं आणि केळ्याचं कॉम्बिनेशन अनेकदा प्रोटीन शेकमध्ये वापरले जातं. पण काही लोकांसाठी हे जड ठरतं. यामुळे तुम्हाला गॅसचा त्रास होऊ शकतो.