Manasvi Choudhary
हिंदू धर्मामध्ये नवरात्रौत्सव या सणाला विशेष महत्व आहे.
पंचागानुसार यावर्षी शारदीय नवरात्रौत्सव १५ ऑक्टोबर रविवारपासून सुरू होईल आणि २३ ऑक्टोबरला सोमवारी समाप्त होईल.
नवरात्रौत्सवात नऊ दिवस आदीशक्तीच्या नऊ वेगवेगळ्या रुपांची पूजा केली जाते.
नवरात्रीमध्ये नऊ दिवस देवीला नऊ वेगळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून आरधना केली जाते.
१५ ऑक्टोबरला म्हणजे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी दुर्गामातेला केशरी रंगांची साडी नेसवून तिची पूजा-अर्चना करावी.
१६ ऑक्टोबरला म्हणजे नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवीला पांढऱ्या रंगांची साडी नेसवून देवीची आरधना करावी.
१७ ऑक्टोबरला म्हणजे नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवीला लाल रंगांची साडी नेसवून पूजा करावी.
१८ ऑक्टोबरला म्हणजे नवरात्रीच्या चौथ्या दिवशी देवीला गडद निळ्या रंगांची साडी नेसवून पूजा करावी.
१९ ऑक्टोबरला म्हणजे नवरात्रीच्या पाचव्या दिवशी देवीला पिवळ्या रंगांची साडी नेसवून आराधना करावी.
२० ऑक्टोबरला म्हणजे नवरात्रीच्या साहव्या दिवशी देवीला हिरव्या रंगांची साडी नेसवून तिची आराधना करावी.
२१ ऑक्टोबरला म्हणजे नवरात्रीच्या सातव्या दिवशी देवीला राखाडी रंगांची साडी नेसवून पूजा करावी.
२२ ऑक्टोबरला म्हणजे नवरात्रीच्या आठव्या दिवशी देवीला जांभळ्या रंगांची साडी नेसवून तिची पूजा अर्चना करावी.
२३ ऑक्टोबर म्हणजे नवरात्रीच्या नवव्या दिवशी देवीला मोरपंखी रंगांची साडी नेसवून तिची पूजा करावी.