Dhanshri Shintre
नवरात्रीचा शुभारंभ यंदा 22 सप्टेंबरला होणार असून, या दिवशी देवीच्या नऊ रूपांची विधीवत पूजा केली जाईल.
अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिप्रदा पासून नवमीपर्यंत दरवर्षी नवरात्रीचा भव्य उत्सव उत्साहाने साजरा केला जातो.
नवरात्रीत पूजा करून उपवास करण्याची परंपरा आहे, यामुळे देवी प्रसन्न होऊन भक्तांवर आपली विशेष कृपा करते अशी श्रद्धा आहे.
परंपरेनुसार नवरात्रीपूर्वी घरातील काही वस्तू बाहेर काढल्या जातात, ज्यामुळे देवीचा शुभ प्रवेश घरामध्ये होतो असे मानले जाते.
नवरात्रीपूर्वी घरातील बंद घड्याळ घराबाहेर काढणे शुभ मानले जाते, अन्यथा घरात नकारात्मक ऊर्जा टिकून राहते असे मानले जाते.
घरात बंद घड्याळ ठेवल्यास ते अशुभ मानले जाते, कारण त्यामुळे देवीचा प्रवेश थांबून ती बाहेर निघून जाते.
घरात तुटलेला झाडू ठेवणे अशुभ मानले जाते, कारण त्यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते आणि जीवनात अडचणी निर्माण होतात.
नवरात्रीपूर्वी घरातील तुटलेल्या मूर्ती काढणे आवश्यक मानले जाते, कारण अशा मूर्ती ठेवल्यास घरात अशुभता निर्माण होते.
नवरात्रीपूर्वी घरातील तुटलेल्या चपला बाहेर काढा, कारण त्या ठेवल्यास घरात दरिद्रता आणि नकारात्मकता येण्याची शक्यता असते.