Priya More
महाराष्ट्रात आदिशक्तीची साडेतीन शक्तिपीठे प्रसिद्ध आहेत. कोल्हापूर, तुळजापूर, सप्तश्रृंगी आणि माहूरला देवींची मंदिरं आहेत.
'अ'कार पीठ माहूर 'उ'कार पीठ तुळजापूर 'म'कार पीठ कोल्हापूर आणि ऊर्धमात्रा सप्तशृंगी.
नवरात्रोत्सवानिमित्ताने महाराष्ट्रातील साडेतीन शक्तींपीठांचे दर्शन घेण्यासाठी भाविक गर्दी करतात.
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठ असलेल्या देवींच्या मंदिरामध्ये भक्तीभावावे पूजा करण्यात आली.
साडेतीन शक्ती पीठांपैकी पहिले पूर्ण शक्तिपीठ असलेल्या कोल्हापूरच्या आई अंबाबाईचे मंदिर नवरात्रोत्सवानिमित्त सजवण्यात आले आहे.
अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी पहिल्याच दिवशी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. आज देवीचे आकर्षक रूप भाविकांना पाहायला मिळाले.
महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी श्री तुळजाभवानी देवीचे तुळजापूर क्षेत्र हे एक पूर्ण शक्तिपीठ आहे.
तुळजापूरची भवानीदेवी महाराष्ट्राची कुलस्वामीनी आहे. देवीचे दर्शन घेण्यासाठी आज भाविकांनी गर्दी केली होती.
माहूरगडाची रेणुकादेवी हे महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन पीठांपैकी एक पूर्ण शक्तिपीठ आहे.
नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यात असलेल्या या देवीच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने येतात.
साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्ध्या पीठाचे महत्त्वाचे स्थान म्हणजे सप्तश्रृंगीगड हे आहे.
नाशिक जिल्ह्यातील वणी येथे असलेल्या सप्तश्रृंगीगडावर देवीच्या दर्शनासाठी भाविक दरवर्षी गर्दी करतात.