Manasvi Choudhary
संपूर्ण देशभरात कालपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात झाली आहे.
मंदिरामध्ये तसेच घरोघरी घटस्थापना करत दुर्गामातेचे मनोभावे पूजन केले जात आहे.
नवरात्रीच्या नऊ दिवसात प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या रंगाला महत्व आहे.
आज नवरात्रीचा दुसरा दिवस सोमवार पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे.
देवीचे दुसरे रूप ब्रम्हचारिणी देवीला पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करून तिची आराधना करावी.
पांढरा रंग शुद्धता आणि साधेपणाचे प्रतिक आहे.
महिलांचे ग्रुप, कर्मचारी महिला तसेच पुरूष रंगाचे कपडे घालून सण साजरा करतात.