Priya More
आज शारदीय नवरात्रोत्सवाच्या चौथ्या दिवशी आई अंबाबाईची विधीवत पूजा करण्यात आली.
आज श्री अंबाबाई देवीची श्री कृष्मांडा देवी रूपातील पूजा करण्यात आली.
तिसऱ्या दिवशीही अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली.
शारदीय नवरात्रोत्सवाच्या चौथ्या दिवशी आई तुळजाभवानीची पूजा करण्यात आली.
परंपरेप्रमाणे कुलस्वामिनी तुळजाभवानीची विधीवत पूजा करण्यात आली.
तुळजाभवानी देवीच्या मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली आहे. देवीच्या दर्शनाला भाविकांची गर्दी झालीये.
माहूरच्या रेणुका मातेची नवरात्रीच्या चौथ्या दिवशी विधीवत पूजा करण्यात आली.
रेणुका देवी मंदिरात नवरात्रीनिमित्त दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे.
नाशिकच्या वणी येथील सप्तश्रृंगी गडावर असलेल्या सप्तश्रृंगी देवीची विधीवत पूजा करण्यात आली.
नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी आई सप्तश्रृंगीला चौथी माळ चढवण्यात आली.