Priya More
आज शारदीय नवरात्रोत्सवाच्या पाचव्या दिवशी आई अंबाबाईची विधीवत पूजा करण्यात आली.
श्री करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या मंदिरामध्ये नवरात्रोत्सवाचा जल्लोष पाहायला मिळत आहे.
नवरात्रीच्या नऊ दिवस अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी भाविक मोठी गर्दी करतात.
शारदीय नवरात्रोत्सवाच्या पाचव्या दिवशी आई तुळजाभवानीची पूजा करण्यात आली.
परंपरेप्रमाणे कुलस्वामिनी तुळजाभवानीला पाचवी माळ चढवण्यात आली.
कुलस्वामिनी जगदंबा देवीच्या मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली आहे. देवीच्या दर्शनाला भाविकांची मोठी गर्दी केलीये.
माहूरच्या रेणुका मातेची नवरात्रीच्या पाचव्या दिवशी विधीवत पूजा करण्यात आली.
रेणुका देवी मंदिरात नवरात्रीनिमित्त दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे.
नाशिकच्या वणी येथील सप्तश्रृंगी गडावर असलेल्या सप्तश्रृंगी देवीची विधीवत पूजा करण्यात आली.
नवरात्रीच्या पाचव्या दिवशी आई सप्तश्रृंगीला पाचवी माळ चढवण्यात आली.