Manasarovar : मानसरोवरहून २- ३ तासांत पोहचाल 'या' सुंदर ठिकाणी, वीकेंडला पावसाच्या सरींमध्ये करा भटकंती

Shreya Maskar

मानसरोवर

मानसरोवर हे नवी मुंबई येथील उपनगरीय रेल्वे स्टेशन आहे. पनवेल गाडी पकडून तुम्ही मानसरोवर येथे पोहचाल. वीकेंडला फॅमिलीसोबत येथे फिरण्याचा नक्की प्लान करा.

Mansarovar | google

कर्नाळा पक्षी अभयारण्य

मानसरोवरपासून सुमारे २० किमी अंतरावर कर्नाळा पक्षी अभयारण्य आहे. पावसाळ्यात १५० हून अधिक प्रजातींचे पक्षी पाहायला मिळतील. कर्नाळा पक्षी अभयारण्यात कर्नाळा किल्ला देखील आहे. येथे तुम्ही ट्रेक प्लान करा.

Karnala Bird Sanctuary | pinterest

पांडवकडा धबधबा

मानसरोवरजवळ खारघर येथे १०७ मीटर उंचीचा पांडवकडा धबधबा आहे. येथे तुम्ही मनसोक्त फोटोशूटचा आनंद घेऊ शकता.

Pandavkada Falls | pinterest

माथेरान

मानसरोवरपासून सुमारे ४० किमी अंतरावर 'इको-सेन्सेटिव्ह' आणि वाहनांची वर्दळ नसलेले माथेरान हे थंड हवेचे ठिकाण आहे. धुक्याने वेढलेली , खोल दऱ्या आणि पावसाळ्यात हिरव्यागार निसर्गासाठी ठिकाण प्रसिद्ध आहे.

Matheran | pinterest

माळशेज घाट

पश्चिमेकडील घाटमाथ्यावर सुमारे ९० किमी अंतरावर माळशेज हा निसर्गरम्य घाटमार्ग आहे. दाट धुके, पावसाळ्यात वाहणारे धबधबे यासाठी हे ठिकाण ओळखले जाते. येथे फ्लेमिंगो पक्षीही दिसतात.

Malshej Ghat | pinterest

लोणावळा आणि खंडाळा

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून सुमारे ७५ किमी अंतरावर लोणावळा आणि खंडाळा ही थंड हवेची ठिकाणे आहेत. कुणे धबधबा आणि भुशी धरण ही येथील पावसाळ्यातील प्रमुख आकर्षणे आहेत.

Lonavala and Khandala | pinterest

कपल स्पॉट

सूर्यास्ताचा सुंदर नजारा पाहायचा असेल तर लोणावळा आणि खंडाळा, माथेरान ही बेस्ट ठिकाणे आहेत. तुम्ही येथे कपल ट्रिप देखील प्लान करू शकता.

Couple spot | pinterest

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | pinterest

NEXT : भव्य प्रवेशद्वार, प्राचीन तोफा अन् तलाव; लोणावळ्याजवळ वसलाय 'हा' ऐतिहासिक किल्ला

Fort Near Lonavala | saam tv
येथे क्लिक करा...