Sakshi Sunil Jadhav
उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये थंडावा अनुभवण्यासाठी आणि निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवण्यासाठी नाशिकजवळ अनेक सुंदर ठिकाणं आहेत. वीकेंड ट्रिपसाठी ही ठिकाणं परफेक्ट मानली जातात.
नाशिकपासून सुमारे 30 किमी अंतरावर असलेले हे धार्मिक ठिकाण थंड वातावरणासाठी प्रसिद्ध आहे. सह्याद्रीच्या कुशीत असल्यामुळे येथे शांतता आणि निसर्गसौंदर्य अनुभवता येते.
हिल स्टेशन म्हणून ओळखले जाणारे इगतपुरी थंड हवामान आणि धुक्यासाठी प्रसिद्ध आहे. भातसा धरण आणि विपश्यना सेंटर येथे प्रमुख आकर्षण आहेत.
निसर्गरम्य धरण, धबधबे आणि शांत वातावरण यासाठी भंडारदरा ओळखले जाते. आर्थर लेक आणि रंधा फॉल्स येथे पाहण्यासारखे आहेत.
देवी सप्तश्रृंगीचे प्रसिद्ध मंदिर असलेला हा गड थंड हवामानासाठीही ओळखला जातो. ट्रेकिंग आणि दर्शन दोन्हींसाठी योग्य ठिकाण आहे.
हनुमान जन्मभूमी म्हणून प्रसिद्ध असलेले हे ठिकाण ट्रेकिंगसाठी उत्तम आहे. सकाळच्या वेळेत येथील निसर्ग अधिक आकर्षक दिसतो.
विशेष पायऱ्यांमुळे प्रसिद्ध असलेला हा किल्ला साहसी पर्यटकांसाठी आकर्षण आहे. येथून दिसणारा दृश्य खूप सुंदर असतो.
कमी गर्दी आणि शांत वातावरणामुळे कावनई किल्ला वीकेंड ट्रेकसाठी योग्य आहे. येथे कावनई देवीचे मंदिरही आहे.
नाशिकजवळील हा धबधबा उन्हाळ्यातही थंडावा देतो. नैसर्गिक सौंदर्य आणि शांत वातावरणामुळे पर्यटक आकर्षित होतात.