Nashik Forts : ऑक्टोबर ट्रॅव्हल स्पेशल! नाशिकमधील ७ ऑफबीट किल्ले एकदा फिराच

Shreya Maskar

नाशिक

नाशिक हे भारताची 'वाईन राजधानी' म्हणून प्रसिद्ध आहे. गोदावरी नदीच्या काठावर वसलेले एक प्रमुख तीर्थक्षेत्र आणि आध्यात्मिक केंद्र आहे. येथील ऐतिहासिक ठिकाणांना आवर्जून भेट द्या.

Nashik | google

अंकाई-टंकाई किल्ले

येवला तालुक्यात अंकाई-टंकाई किल्ले आहेत. दोन शेजारील डोंगरांवर असलेले हे किल्ले त्यांच्या सामायिक संरक्षणव्यवस्थेसाठी प्रसिद्ध आहेत. प्राचीन दरवाजे, तटबंदी, गुहा आणि डोंगररांगांचे दृश्य हे येथील आकर्षण आहे.

Ankai-Tankai Fort | google

रामशेज किल्ला

नाशिक शहरापासून साधारण १०–१४ किमी अंतरावर रामशेज किल्ला आहे. मुघल सैन्याविरुद्ध मराठ्यांनी दिलेल्या दीर्घ प्रतिकारामुळे हा किल्ला विशेष प्रसिद्ध आहे. तुलनेने सोपा ट्रेक येथे प्लान करता येतो.

Ramshej Fort | google

हरिहर किल्ला

त्र्यंबकेश्वर परिसरात हरिहर किल्ला वसलेला आहे. कातळात कोरलेल्या अतिशय उभ्या पायऱ्या हे या किल्ल्याचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य आहे.

Harihar Fort | google

अंजनेरी किल्ला

नाशिकपासून साधारण २० किमी अंतरावर अंजनेरी किल्ला वसलेला आहे. हनुमान जन्मस्थळाशी जोडलेली धार्मिक परंपरा, प्राचीन जैन गुहा आणि विस्तीर्ण पठार यामुळे हा किल्ला ऐतिहासिक, सांस्कृतिकदृष्ट्या वेगळा ठरतो.

Anjaneri Fort | google

हातगड किल्ला

सापुतारा जवळ महाराष्ट्र-गुजरात सीमेवर हातगड किल्ला आहे. डोंगरमाथ्यावरील तटबंदी, खडकाळ वाट आणि आजूबाजूचा डोंगराळ परिसर यामुळे हा किल्ला वेगळा अनुभव देतो.

Hatgarh Fort | google

त्रिंगलवाडी किल्ला

इगतपुरी परिसरात त्रिंगलवाडी किल्ला आहे. खडकाळ डोंगरमाथा, जुन्या वास्तूंचे अवशेष आणि पावसाळ्यानंतर खुलणारी हिरवळ यासाठी हा किल्ला ओळखला जातो.

Tringalwadi Fort | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | google

NEXT : इतिहासप्रेमींसाठी खास ठिकाण! डोंगराच्या माथ्यावर वसलेल्या मंदिरामुळे प्रसिद्ध आहे 'हा' किल्ला

Fort | AI PHOTO
येथे क्लिक करा...