Manasvi Choudhary
नारळी पौर्णिमेला नारळी भात बनवण्याची परंपरा फार पूर्वीपासून आहे. अनेकांना नारळी भात खायला आवडतो.
गूळ, नारळ आणि सुगंधी तांदळामुळे नारळी भाताला खास पारंपरिक चव मिळते. नारळी भात बनवताना तुम्ही कोणत्या टिप्स लक्षात ठेवणे महत्वाचे आहे.
नारळी भात बनवण्यासाठी साध्या तांदळाऐवजी तुम्ही बासमती किंवा आंबेमोहर तांदूळ निवडा यामुळे भात सुटसुटीत, मोकळा होतो.
तांदूळ शिजवण्याआधी साधारण १५ ते २० मिनिटे आधी स्वच्छ धुवून पाण्यात भिजत ठेवा.
नारळी भात बनवण्यासाठी भात शिजवल्यानंतर मोकळा करा यामुळे भात चिकट होत नाही.
पारंपरिक पद्धतीने नारळी भात बनवण्यासाठी गुळाचा वापर करतात. तांदूळ शिजल्यानंतर त्यात किसलेला गूळ मिक्स करा. जर तांदूळ कच्चा असेल आणि तुम्ही गूळाचा किस मिक्स केला तर भात कडक होऊ शकतो व नीट शिजणार नाही.
भातमध्ये नारळ टाकण्यासाठी नारळाचा किस तुपावर खमंग परतून घ्या यामुळे नारळी भाताला चव आणि सुगंध येतो.
नारळी भात बनवल्यानंतर शेवटी केशर किंवा जायफळ पावडर मिक्स करा.