ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करताना नागांना दूध पाजतात यामागचे कारण जाणून घ्या
नागाला दूध प्यायला देण्याच्या परंपरेचा संबंध पांडवांचे वंशज आणि कलियुगाचा पहिला राजा यांच्या मृत्यूशी संबधित आहे.
परीक्षित नावाच्या एका राजाचा मृत्यू सापाच्या दंशाने होतो. वडिलांच्या मृत्यूनंतर परीक्षितचा मुलगा जन्मेजय पृथ्वीवरील सर्व सांपाना संपवून टाकण्याचा निश्चय करतो
यासाठी तो यज्ञ करतो यज्ञाच्या प्रभावामुळे जगातील सर्व साप यज्ञकुंडात येऊन पडतात भयभीत झालेला तक्षक नाग आपला जीव वाचवण्यासाठी इंद्राच्या सिंहासनावर जाऊन लपतो.
यज्ञाचा प्रभाव इतका असतो की, प्रभावामुळे इंद्राचे सिंहासन हवनकुंडाच्या दिशेने ओढले जाऊ लागते. म्हणूनच ऋषींनी आणि देवतांनी राजा जन्मजेयाला विनंती केली की जर जगभरातील सर्व सापांना मारले तर निसर्गाचा समतोल बिघडून जाईल.
राजा जन्मेजयने देवांची विनंती मान्य केली आणि तक्षकाला माफ केले. यानंतर यज्ञ कुंडात जळलेल्या नागांना बरे करण्यासाठी आस्तिक मुनींनी नांगाना गाईच्या दुधाने आंघोळ घातली. यामुळे नागांचा मत्सर शांत झाला
ज्या दिवशी आस्तिक मुनींनी सापांना गायीच्या दुधाने आंघोळ घातली, तो दिवस श्रावण महिन्याची पंचमी होता. तेव्हापासून श्रावण महिन्याच्या पंचमीचा दिवस सापांना समर्पित केला जातो.
म्हणूनच नागाला दुधाने आंघोळ घालतात तसेच या दिवशी नागाची पूजा करून त्यांच्या संरक्षणाचा संदेश दिला जातो. शास्त्रातसुद्धा नागाला दुधाने आंघोळ घालतात, मात्र फार पूर्वीपासून दुधाने आंघोळ घालण्याऐवजी दूध पाजण्याची प्रथा सुरू झाली आहे