Mouni Roy Birthday: अभिनेत्री नसती तर आज मौनी 'या' क्षेत्रात असती

Manasvi Choudhary

टिव्ही अभिनेत्री मौनी रॉय

अभिनेत्री मौनी रॉय ही टेलिव्हिजन विश्वातील सध्याची टॉपची अभिनेत्री आहे.

Mouni Roy Birthday | Instagram

मौनी रॉयचा वाढदिवस

मौनी रॉयचा जन्म 27 सप्टेंबर 1985 रोजी झाला. आज मौनी रॉय तिचा 37 वाढदिवस साजरा करत आहे.

Mouni Roy Birthday | Instagram

या ठिकाणी घेतलंय शिक्षण

मौनीने बाबरहाट कूचबिहारच्या सेंट्रल स्कूलमधून शिक्षण घेतले, पुढे मौनीने दिल्लीच्या इंग्रजी ऑनर्समधून ग्रॅज्युएशन केले

Mouni Roy Birthday | Instagram

मौनीच्या पालकांची इच्छा

मौनीने पत्रकार व्हावे अशी तिच्या घरच्याची इच्छा होती म्हणून मौनीने जामिया मिलिया इस्लामियामध्ये मास कम्युनिकेशनमध्ये प्रवेश घेतला

Mouni Roy Birthday | Instagram

लहानपणापासून अभिनयाची आवड

पण मौनी रॉयला सुरुवातीपासूनच अभिनयाची आवड असल्याने तिने अर्ध्यातूनच मास कम्युनिकेशनचे शिक्षण सोडले

Mouni Roy Birthday | Instagram

या मालिकेतून केलंय पदार्पण

मुंबईला आल्यानंतर मौनीने रॉयने २००६ मध्ये 'क्योंकी सास भी कभी बहू थी' या मालिकेतून इंडस्ट्रीत पाऊल ठेवले त्यानंतर मागे वळून पाहिलेच नाही.

Mouni Roy Birthday | Instagram

विशेष लोकप्रियता

कस्तुरी, देवों के देव महादेव, , 'नागिन', 'जुनून', 'ऐसी नफरत तो कैसा इश्क' यासांरख्या मालिंकामधून मौनी घराघरात पोहचली.

Mouni Roy Birthday | Instagram

टिव्ही ते बॉलिवूड असा प्रवास

टीव्हीच्या छोट्या पडद्यापासून सुरू झालेला मौनीचा प्रवास आता बॉलिवूडच्या मोठ्या पडद्यापर्यंत पोहोचला आहे.

Mouni Roy Birthday | Instagram

फॅशन स्टाईल

केवळ अभिनयच नव्हे, तर फॅशन विश्वात देखील मौनीने तिच्या नावाचा ठसा उमटवलाय.

Mouni Roy Birthday | Instagram

NEXT: Vidula Chougule: विदुलाची साडीतली हटके झलक पाहिलीत का ?

Vidula Chougule | Instagram @vidulachougule
येथे क्लिक करा...