साम टिव्ही ब्युरो
'नागिन' ही टीव्हीवरील मालिका आणि त्यातील पात्र जवळपास सर्वांनाच ठाऊक आहेत.
त्यात सुरभी ज्योती हिचं पात्र घराघरात पोहोचलं आहे.
टीव्ही इंडस्ट्रीतील या लोकप्रिय अभिनेत्रीनं अभिनयानं सगळ्यांचीच मनं जिंकली आहेत.
तिनं टीव्ही इंडस्ट्री आणि प्रेक्षकांच्या मनात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलंय.
सोशल मीडियावर सुरभी तिचे नवनवीन फोटो शेअर करत असते.
नुकताच साडीतील सुरभीचा स्वॅग पाहून चाहते तिच्या प्रेमात पडले आहेत.
'कुबूल है' आणि 'नागिन'मधील सुरभीला छोट्या पडद्यावर बघितलं की आपसुकच तिचं पात्र डोळ्यांसमोर येतं.
सुरभीला हटके स्टाइल आणि वेगवेगळ्या पोजमध्ये फोटोशूट करायला आवडतं.
पारंपारिक वेशभूषेत असो की वेस्टर्न लूकमध्ये, सुरभीच्या सौंदर्याची भुरळ सगळ्यांनाच पडते.
सुरभीच्या लूकचे लाखो चाहते 'दिवानें' आहेत. चाहत्यांकडून कमेंटमधून प्रेमवर्षाव सुरुच असतो.