Manasvi Choudhary
मुंबई आणि वडापाव हे समीकरण जगभरात प्रसिद्ध आहे. मुंबईकरांसाठी वडापाव केवळ एक खाद्यपदार्थ नसून ती एक भावना आहे.
मात्र तुम्हाला माहितीये का? मुंबईकरांना वडापाव का अधिक आवडतो. याचे कारण काय
मुंबईत येणारा प्रत्येक व्यक्ती हा वडापाव खातो मुंबई हे महागाईचे शहर असले तरी वडापाव आजही सर्वसामान्यांच्या खिशाला परवडतो. अगदी १०-२० रुपयांत पोट भरेल असा हा एकमेव पदार्थ आहे
मुंबई हे धावपळीचे शहर आहे. येथे अनेकांना बसून निवांत जेवण्यासाठी देखील वेळ नसतो अशावेळी वडापाव घेतला आणि चालता- फिरता खाल्ला तरी पोट भरते.
गरमागरम बटाटा वडा, सोबत खमंग लसणाची चटणी आणि तळलेली हिरवी मिरची असं हे कॉम्बिनेशन चवीष्ट लागते. वडापावची ही झणझणीत चव मुंबईकरांचे चोचले पुरवणारी आहे.
मुंबईतील अनेक ठिकाणी वडापावचे स्टॉल्स, दुकाने आहेत. अनेक हॉटेल्समध्ये वडापाव मिळतो. स्वस्त आणि मस्त वडापाव खाण्यासाठी गर्दी होते.
वडापाव बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे. वडापाव हा झटपट होणारा खाद्यपदार्थ आहे.