Shreya Maskar
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) हे दक्षिण मुंबईतील बोरी बंदर येथील फोर्ट परिसरात आहे. तुम्ही येथे वीकेंडला फॅमिली आणि फ्रेंड्स ट्रिप प्लान करू शकता.
कमला नेहरू पार्क हे लहान मुलांसाठी एक सुंदर लोकेशन आहे. येथे जगप्रसिद्ध 'म्हातारीचा बूट' आहे. येथून मरीन ड्राइव्हचे विहंगम दृश्य दिसते.
मरीन ड्राइव्हला अनेकदा 'क्वीन्स नेकलेस' म्हणून ओळखले जाते. जो सूर्यास्ताच्या दृश्यांसह निवांत संध्याकाळच्या पिकनिकसाठी बेस्ट आहे. येथे समुद्रकिनारी निवांत बसण्याचा आनंद घेता येतो.
गेटवे ऑफ इंडियापासून फेरीने प्रवास करून तुम्ही थोड्याच वेळात एलिफेंटा लेणीला पोहचाल. एलिफेंटाला घारापुरी लेणी असेही म्हणतात. येथे वास्तुकलेचा अद्भूत नजारा पाहायला मिळतो.
हँगिंग गार्डन हे मुंबईतील मलबार हिल्समध्ये वसलेले आहे. अरबी समुद्राचे विहंगम दृश्य येथून दिसते. तुम्ही येथे संध्याकाळी आवर्जून फिरायला जा.
तुम्हाला शॉपिंगचा आनंद घ्यायचा असेल तर क्रॉफर्ड मार्केट, मंगलदास मार्केट, फॅशन स्ट्रीट, झवेरी बाजार या ठिकाणांना नक्की भेट द्या.
रिमझिम पावसात ओले चिंब रस्ते, हिरवागार निसर्ग आणि चविष्ट स्ट्रीट फूडचा आनंद घ्या.
वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.