Mumbai To Grushneshwar: मुंबईहून घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग दर्शनासाठी प्रवास कसा करायचा? जाणून घ्या रेल्वे, बस आणि सर्वोत्तम पर्याय

Dhanshri Shintre

मुंबई ते घृष्णेश्वर अंतर

मुंबई ते घृष्णेश्वर मंदिराचे एकूण अंतर सुमारे ३३० ते ३५० किलोमीटर आहे. प्रवास साधारणतः ७ ते ८ तासांचा असतो, मार्ग आणि वाहनावर अवलंबून आहे.

रेल्वेने प्रवास

मुंबईहून औरंगाबादपर्यंत थेट अनेक रेल्वे गाड्या उपलब्ध आहेत. मुख्य रेल्वे स्थानक औरंगाबाद स्टेशन आहे.

एसटी बसने प्रवास

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (MSRTC) बस मुंबईहून औरंगाबादपर्यंत नियमित धावतात.

कारने प्रवास

खाजगी कारने प्रवास करणे सोयीस्कर आहे. त्यातील सर्वात लोकप्रिय मार्ग म्हणजे मुंबई -ठाणे -कसारा घाट- इगतपुरी - नाशिक - वैजापूर - एलोरा - घृष्णेश्वर मंदिर हा आहे.

रस्ता मार्गाचा तपशील

NH 160 आणि नंतर NH 52 मार्गे प्रवास केल्यास रस्ता सुस्थितीत आणि निसर्गरम्य आहे. रस्त्यात नाशिक, सिन्नर, वैजापूर या ठिकाणी थांबता येते.

मंदिर दर्शन वेळ

घृष्णेश्वर मंदिर दररोज सकाळी ५:३० ते रात्री ९:३० पर्यंत खुले असते. सोमवार आणि श्रावण महिन्यात भाविकांची विशेष गर्दी असते.

पर्यटन आकर्षण

घृष्णेश्वर मंदिराजवळ प्रसिद्ध एलोरा लेणी, बिबी का मकबरा, दौलताबाद किल्ला ही पर्यटनस्थळे आहेत. एका दिवसाच्या प्रवासात सर्व ठिकाणे पाहता येतात.

NEXT: मुंबईवरून शनि शिंगणापूर प्रवास करायचा आहे? वाचा रेल्वे, बस आणि खाजगी वाहनाचे पर्याय

येथे क्लिक करा