Sakshi Sunil Jadhav
नाश्त्याला काहीतरी चटपटीत आणि झटपट खायचं असेल तर मुंबई स्टाइल रगडा पेटिस नक्की ट्राय करा.
गडा बनवण्याच्या आदल्या रात्री ¾ कप पांढरे वाटाणे पाण्यात भिजत ठेवा.
दुसऱ्या दिवशी वाटाण्यात पाणी, मीठ आणि थोडा खाद्य सोडा घालून कुकरमध्ये मऊ होईपर्यंत शिजवा.
कढईत तेल गरम करून जिरे, आलं, हिरवी मिरची, हळद, लाल तिखट आणि धणे पावडर परतून घ्या.
मसाल्यात उकडलेले वाटाणे आणि आमचूर पावडर घालून साधारण ५ मिनिटं शिजवा.
उकडलेले बटाटे मॅश करून त्यात पाण्यात भिजवलेला ब्रेड, जिरे पावडर आणि मीठ मिसळा. बटाटाच्या मिश्रणाचे गोल-चपटे आकाराचे पेटिस बनवून गरम तेलात सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा.
सर्व्हिंग प्लेटमध्ये गरम पेटिस ठेवून त्यावर भरपूर गरमागरम रगडा घाला.
रगड्यावर हिरवी चटणी, चिंचेची चटणी, गोड चटणी आणि दही घालून वरून चाट मसाला भुरभुरवा आणि सर्व्ह करा.