Nagpur Fort : नागपूरच्या मध्यभागी उभा असलेला शौर्याचा साक्षीदार, 'या' किल्ल्यावर गेल्यावर अनुभवा समृद्ध इतिहास

Shreya Maskar

नागपूर

नागपूर येथे सीताबर्डी किल्ला आहे. नागपूर शहराच्या मध्यवर्ती भागात हे ऐतिहासिक ठिकाण आहे. तुम्ही येथे पावसाळ्यात नक्की फिरायला जा.

Nagpur | google

सीताबर्डी किल्ला

सीताबर्डी किल्ला हा १८१७ मधील ऐतिहासिक 'सीताबर्डीची लढाई', महात्मा गांधींना ठेवण्यात आलेली कारागृह-कोठडी आणि सध्या भारतीय लष्कराच्या नियंत्रणाखाली असलेला परिसर यांसाठी प्रसिद्ध आहे.

Sitabardi Fort | google

इतिहास

सीताबर्डी किल्ला नागपूरमधील दोन टेकड्यांवर वसलेला आहे. हा किल्ला मराठा आणि ब्रिटिश वसाहतवादी इतिहासातील एक महत्त्वपूर्ण खूण मानला जातो.

History | google

किल्ल्याचे महत्त्व

नागपूरमधील सीताबर्डी किल्ल्याला ऐतिहासिकदृष्ट्या मोठे महत्त्व आहे; कारण येथे १८१७ मध्ये 'सीताबर्डीची लढाई' झाली होती आणि पुढे स्वातंत्र्यसैनिक महात्मा गांधी यांना येथे काही काळ स्थानबद्ध करून ठेवण्यात आले होते.

Importance of Fort | google

किल्ल्याची रचना

सीताबर्डी किल्ल्याची रचना दोन टेकड्यांवर वैशिष्ट्यपूर्णरीत्या करण्यात आली आहे. या दोन उंच भागांमुळे किल्ल्याचा आराखडा तयार झाला आहे. 'मोठी टेकडी' आणि 'छोटी टेकडी'

Fort structure | google

किल्ला कोणी बांधला?

सीताबर्डी किल्ला मूळतः १७०२ मध्ये गोंड राजा 'बख्त बुलंद शाह' यांनी बांधला होता. त्यानंतर १८१७-१८१८ च्या सुमारास 'मुधोजी द्वितीय भोसले' आणि 'ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी' यांनी त्याचे बळकटीकरण, पुनर्बांधणी केली.

Who built the fort? | google

कसं जाल?

मुंबईहून नागपूरपर्यंत ट्रेनने प्रवास करा. पुढे रिक्षा किंवा बसने सीताबर्डी किल्ल्याच्या पायथ्याच्या गावी पोहचा. त्यानंतर छोटा ट्रेक करून किल्ल्यावर जाता येते.

how do you go | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

fort | google

NEXT : भव्य तलाव अन् किल्ल्याच्या आत ४०० वर्षे जुनी तोफ! रत्नागिरीतील 'या' ऐतिहासिक किल्ल्याचं गुपित माहितीये का?

Ratnagiri Fort | AI PHOTO
येथे क्लिक करा...