Mumbai : गर्दीपासून दूर, इतिहासाच्या जवळ! वीकेंडला नक्की फिरा मुंबईत लपलेली 'ही' ५ ठिकाणे

Shreya Maskar

सायन हिल किल्ला

सायन हा १७ व्या शतकात ब्रिटिशांनी बांधलेला हा एक लहान किल्ला टेकडीवर वसलेला आहे. ब्रिटिशांच्या ताब्यातील मुंबई आणि पोर्तुगीजांच्या ताब्यातील साल्सेट बेट यांच्यातील सीमा दर्शवण्यासाठी याची रचना करण्यात आली होती.

Sion Hill Fort | google

शिवडी किल्ला

१६८० मध्ये ब्रिटिशांनी पूर्व किनारपट्टीवर बांधलेला १७ व्या शतकातील शिवडी किल्ला महत्त्वाचे ऐतिहासिक ठिकाण आहे. प्रतिस्पर्धी नौदलाच्या शक्तींपासून बेटाचे रक्षण करण्यासाठी हा किल्ला बांधला गेला होता.

Shivdi Fort | google

वरळी किल्ला

माहीम खाडीकडे पाहणारा, १६७५ च्या सुमारास ब्रिटिशांनी बांधलेला वरळी किल्ला पाहायला नक्की जा. कोळीवाड्यात वसलेला हा किल्ला जुन्या काळातील बेटाच्या संरक्षण-चौक्यांची झलक आणि ग्रामीण परिसराचा अनुभव देतो.

Worli Fort | google

बाणगंगा तलाव

बाणगंगा तलाव वाळकेश्वर येथील लहान मंदिरांच्या समूहाने वेढलेला हा गोड्या पाण्याचा प्राचीन तलाव आहे. १४ व्या शतकातील आणि शिलाहार राजवटीच्या काळातील हा तलाव, शहराच्या गजबजलेल्या रस्त्यांच्या अगदी जवळ असूनही शांततेचा एक उत्तम अनुभव देतो.

Banganga Lake | google

गिल्बर्ट हिल

काळ्या बेसाल्ट खडकाचा २०० फूट उंच असा एकच अखंड खडक आहे. यात लाखो वर्षांचा ज्वालामुखीचा इतिहास दडलेला आहे.

Gilbert Hill | google

महाकाली लेणी

अंधेरीत डोंगराच्या कडेला टेकलेली, महाकाली लेणी इतिहासप्रेमीसाठी खूपच खास आहे. १९ रॉक-कट स्मारकांचा हा समूह ईसापूर्व 1 ले शतक ते 6 व्या शतकाच्या दरम्यान बांधला गेला होता.

Mahakali Caves | google

वांद्रे किल्ला

वांद्रे किल्ल्याला कॅस्टेला डी अगुआडा असेही म्हणतात. १६४० मध्ये वांद्रे येथील भूभागाच्या टोकावर पोर्तुगीजांनी बांधलेला हा एक टेहळणी बुरूज आहे. येथून वांद्रे-वरळी सी-लिंकचे सुंदर दृश्य दिसते.

Bandra Fort | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | google

NEXT : ३,५०० फूट उंचीवरचा सह्याद्रीतील लपलेला खजिना, नाशिकला गेल्यावर करा 'या' किल्ल्यावर भटकंती

Nashik Fort | AI PHOTO
येथे क्लिक करा...