ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आजच्या काळात सरकार कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर पेन्शन देते, परंतु मुघल काळात सम्राटालाही पेन्शन मिळत असे.
मुघल साम्राज्यात शाह आलम दुसरा आणि बहादूर शाह जफर दुसरा सारखे सम्राट होते ज्यांना इंग्रजांकडून पेन्शन मिळत असे.
१७६५ मध्ये ब्रिटीश आणि मुघल यांच्यात झालेल्या अलाहाबाद (आता प्रयागराज) करारानंतर पेन्शन सुरू करण्यात आली.
मुघल सम्राट शाह आलमला इंग्रजांकडून २६ लाख रुपये पेन्शन मिळत असे, पण एकेकाळी ती कमी करुन १ लाख रुपये करण्यात आली.
शेवटचा मुघल सम्राट बहादूर शाह जफरच्या कारकिर्दीत पेन्शन १ लाख रुपयांपर्यंत घसरले होते. एवढ्या पैशातून त्यांना आपला खर्च भागवावा लागला.
मुघलांच्या घसरत्या दर्जाचा फायदा इंग्रज घेत होते. मुघल कमकुवत झाले आणि साम्राज्य चालवण्यासाठी ते ब्रिटिश पेन्शनवर अवलंबून राहिले.
ब्रिटिशांनी मुघल सम्राट बहादूर शाह जफर याला अटक करून रंगूनला पाठवले. ७नोव्हेंबर १८६२ रोजी त्यांनी तिथेच शेवटचा श्वास घेतला आणि मुघल सल्तनतचा अंत झाला.