Bharat Jadhav
बॉलीवूड आणि मराठी अभिनेत्री मृणाल ठाकूर तिच्या लूकसाठी सतत चर्चेत असते.
मृणाल ठाकूर सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय आहे. सोशल मीडियावर तिने फोटो टाकला की तो लगेच व्हायरल होतो.
मृणाल ठाकूरने तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
ही फोटो शेअर करताना अभिनेत्री मृणालने लोकेशनमध्ये हैदराबादला टॅग केले आहे.
मृणाल ठाकूरने लेहेंगा घातला आहे. यात ती खूपच सुंदर दिसत आहे.
मृणालने निळ्या रंगाचा फ्लोरल प्रिंटेड लेहेंगा घातलाय. ज्यासोबत तिने ब्लाउज आणि दुपट्टा मॅच केलाय. या ड्रेसमध्ये ती अप्रतिम सुंदर दिसत आहे.
या सुंदर ड्रेससोबत मृणालने हातात स्टायलिश बांगड्या आणि कानात झुमके घातले आहेत. यामुळे तिचं सौंदर्य अजून खुललंय.
मृणालने फोटोशूट करताना केस मोकळे सोडले आहेत. केस मोकळे सोडून तिने किलर पोझ दिलीय. तिची पोझ पाहून अनेकांची धक-धक वाढलीय.