Sakshi Sunil Jadhav
सगळ्यांच महिलांना जास्त मेकअप न करता दिवसभर टवटवीत दिसायला आवडतं. पण त्यांना काही सोप्या टिप्स माहितच नसतात.
पुढील माहितीत आपण काही सोप्या टिप्स आणि मेकअप रुटीन जाणून घेणार आहोत. जे तुम्ही सकाळी फॉलो केलं पाहिजे.
एक छोटा बर्फाचा तुकडा चेहऱ्यावर हलक्या हाताने फिरवा. यामुळे स्किन टाईट होते आणि नैसर्गिक ग्लो येतो.
गुलाब पाणी टोनर म्हणून वापरा. यामुळे त्वचा हायड्रेट राहते आणि फ्रेशनेस टिकतो.
अॅलोवेरा जेल लावल्याने त्वचेला नैसर्गिक मॉइश्चर मिळतं आणि पिंपल्स कमी होण्यास मदत होते.
मध चेहऱ्यावर लावून 5 मिनिटे मसाज करा. यामुळे त्वचा मऊ आणि ग्लोइंग होते.
कॉटनच्या सहाय्याने कच्चं दूध चेहऱ्यावर लावा. हे नैसर्गिक क्लेंझर म्हणून काम करतं.
थोडं नारळ तेल लावल्याने त्वचा मऊ राहते आणि कोरडेपणा दूर होतो.
जड मेकअप टाळा. BB क्रीम, काजळ आणि लिप बाम वापरून नैसर्गिक लूक ठेवा.
सकाळी एक ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. यामुळे शरीर डिटॉक्स होतं आणि त्वचा चमकदार दिसते.