Shruti Vilas Kadam
साताऱ्यापासून सुमारे २५ किलोमीटर अंतरावर असलेला ठोसेघर धबधबा पावसाळ्यात पर्यटकांसाठी प्रमुख आकर्षण ठरतो.
गेल्या काही दिवसांपासून सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात जोरदार पाऊस सुरू असल्याने ठोसेघर धबधबा पूर्ण क्षमतेने कोसळताना दिसत आहे.
सततच्या पावसामुळे डोंगरमाथ्यांवरील ओढे आणि नाले वाहू लागले असून परिसरातील अनेक लहान-मोठे धबधबेही प्रवाही झाले आहेत.
दरी-कपारीतून कोसळणारा ठोसेघर धबधबा पर्यटकांना निसर्गाच्या अप्रतिम सौंदर्याची अनुभूती देत आहे.
शनिवार आणि रविवारी ठोसेघर धबधबा पाहण्यासाठी राज्याच्या विविध भागांतून पर्यटक मोठ्या संख्येने भेट देत आहेत.
धुक्याने वेढलेले डोंगर, हिरवाई आणि प्रचंड वेगाने कोसळणारा धबधबा यामुळे हा परिसर फोटोग्राफी प्रेमींसाठीही आकर्षण ठरत आहे.
धबधब्याजवळ पाण्याचा वेग अधिक असल्याने आणि दगड निसरडे झाल्याने प्रशासनाने पर्यटकांना सुरक्षित अंतर राखून निसर्गाचा आनंद घेण्याचे आवाहन केले आहे.