Monsoon Travel Destinations: पावसाळ्यात फिरायला जायचंय? मग 'या' ४ ठिकाणी नक्की द्या भेट, नैसर्गिक सौदर्य पाहून व्हाल थक्क

Bharat Jadhav

निसर्गाचं सौदर्य

मान्सूनच्या आगमन होताच देशभरातील अनेक पर्यटन स्थळांवर पर्यटकांची गर्दी होऊ लागते. उन्हाळ्यात ओसाड दिसणारे डोंगर मान्सूनच्या काळात हिरव्यागार चादरीने आच्छादले जातात. दऱ्याखोऱ्यांमध्ये धुक्याची चादर पसरते आणि थंड वाऱ्यांमुळे वातावरण अत्यंत आल्हाददायक बनत असते.

मुन्नार

जर तुम्ही पावसाळ्यात जर दक्षिण भारतात पर्यटन करण्याचा विचार करत असाल तर केरळमधील मुन्नार या ठिकाणी जा. पावसाळ्यात येथील धबधबे आणि आजूबाजूची हिरवळ तुम्हाला प्रेमात पाडते.

कूर्ग

दक्षिण भारतातील पावसाळ्यात पर्यटनाचं दुसरं ठिकाण म्हणजे कूर्ग. कूर्ग हे तिथल्या कॉफीच्या मळ्यांसाठी, शांत आणि आल्हाददायक हवामानासाठी कुर्ग बेस्ट आहे. पावसाळ्यात तिथले वाहते धबधबे आणि ढगांनी वेढलेले रस्ते पाहून तुम्ही चक्रावून जाल.

चेरापूंजी

जर तुम्हाला पावसाचे सर्वात सुंदर रूप अनुभवायचे असेल, तर मेघालयातील चेरापुंजी तुमच्या प्रवासाच्या यादीत असायलाच हवे.

नैसर्गिक सौंदर्यासाठी जगप्रसिद्ध

हे ठिकाण सतत पडणारा पाऊस, खोल दऱ्या, उंच धबधबे आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी जगप्रसिद्ध आहे. पावसाळ्यात येथील निसर्ग सौंदर्य अधिकच मनमोहक बनते. ढगांच्या दरम्यानून कोसळणारे धबधबे आणि सर्वत्र पसरलेली दाट हिरवळ पर्यटकांना खरोखरच एक अद्वितीय अनुभव देत असते.

लोणावळा

लोणावळा हे पावसाळ्यात भेट देण्यासाठी सर्वात लोकप्रिय ठिकाणांपैकी एक मानले जाते. मुंबई आणि पुण्यातील लोकांसाठी विकेंड प्लॅन करण्यासाठी छान डेस्टिनेशन आहे.

अद्भुत नजारा

डोंगर, लहान दऱ्या आणि धबधबे यांमुळे प्रवास खरोखरच खास बनत असतात. येथील हवामान जास्त थंड नसते, त्यामुळे कुटुंब, मित्र किंवा जोडीदारासोबत सहलीसाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. जर तुम्ही कमी वेळात निवांत सुट्टी घालवण्यासाठी एखादे ठिकाण शोधत असाल, तर लोणावळा हा एक उत्कृष्ट पर्याय आहे.