Shreya Maskar
पावसाळ्यात बदलत्या वातावरणामुळे सर्दी आणि खोकला होतो. ज्यामुळे श्वास घेताना त्रास होतो, आपले नाकही बंद होते. अशावेळी काही घरगुती उपाय तुम्हाला फायदेशीर ठरतात.
गरम पाण्याची वाफ घेतल्याने नाकातील कफ पातळ होण्यास मदत होते. दिवसातून एकदा किंवा दोनदा ५-१० मिनिटे वाफ घेतल्याने आराम मिळतो.
पावसाळ्यात थंड वातावरणामुळे आपण पाणी प्यायला टाळाटाळ करतो. पण शरीरात पाण्याची पातळी टिकवून ठेवा. भरपूर पाणी प्यायल्याने कफ पातळ होतो.
कोमट मिठाच्या पाण्याने नाक स्वच्छ धुवा.मीठ घातलेल्या स्वच्छ, कोमट पाण्याने नाक धुतल्याने नाकातील घाण आणि कफ बाहेर टाकण्यास मदत होते.
तुम्हाला जास्तच सर्दी झाली असेल तर गरम पाणी, गरमागरम सू, आयुर्वेदिक काढा प्या. यामुळे घशाला आणि नाकाला आराम मिळतो.
झोपताना डोक्याखाली अतिरिक्त उशी ठेवल्याने नाकातील कोंडण कमी होण्यास मदत होण्यास मदत होते. तसेच सर्दीमध्ये जास्त वेळ झोप घ्या.
बाहेरचे जंक फूड आणि स्ट्रीट फूड खाणे टाळा. तसेच नियमित गरम पाणी करूनच प्या.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.