Manasvi Choudhary
महाराष्ट्रात पावसाने सध्या जोरदार हजेरी लावली आहे.
याच पावसात अनेकजण विकेंडला फिरण्याचा प्लान आखतात.
पावसाळा म्हटलं की, हिरवागार निसर्ग आणि धबधब्याची मज्जा काही वेगळीच असते.
महाराष्ट्रात अशी काही ठिकाणी आहेत जेथे तुम्हा ऑफिस सहकारी तसेच फॅमिलीसह भेट देऊ शकता.
लोणावळा हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. पावसाळ्यात या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी असते.
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात नाणेघाट धबधबा आहे. या ठिकाणी पर्यटक खास धबधब्यावर भिजण्यासाठी भेट देतात. नाणेघाट हा उलटा धबधबा म्हणून देखील प्रसिद्ध आहे.
पुण्यापासून जवळ असलेला ताम्हिणी घाट पावसाळ्यात पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात.