Horoscope Monday: आर्थिक बोजा वाढणार! आरोग्याच्या समस्या वाढतील,वाचा सोमवारचे राशीभविष्य

Sakshi Sunil Jadhav

मेष

कामाची धावपळ आणि दगदग याचा वेगळाच जोर वाढलेला असेल. त्यामुळे कामाचा ताण सुद्धा येईल. मनोबल कमी राहील.

Mesh | saam tv

वृषभ

मित्र-मैत्रिणींच्या सहवासामध्ये मन आनंदी राहील. फुलून जाईल. अनेक दिवस अडखळलेले रेंगाळलेले पत्रव्यवहार आज मार्गी लागणार आहेत.

वृषभ राशी | SAAM TV

मिथुन

सामाजिक राजकीय क्षेत्रात पुढाकार घ्याल. उत्साह आणि उमेद वाढती राहील. रखडलेले कामे मार्गी लावून यशाची नवीन धुरा आज तुम्ही बाळगाल.

Mithun Rashi Bhavishya | Yandex

कर्क

महत्त्वाची कामे दुपारनंतरच करावी. काही जणांचा धार्मिक गोष्टींमध्ये सहभाग असेल. मोठ्या प्रवासांच्या दृष्टीने आजचा दिवस चांगला आहे.

कर्क | Saam TV

सिंह

आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. इतरांवर तुमचा प्रभाव राहील. काही क्षेत्रांमध्ये यश तर काही ठिकाणी अपयश अशी परिस्थिती आज राहणार आहे.

सिंह राशी | Saam Tv

कन्या

हितशत्रूंचा त्रास संभवतो आहे.पण त्याचबरोबर चांगली गोष्ट एक अशी ही आपल्या जोडीदाराची कामाच्या ठिकाणी आणि संसारात सुद्धा अपेक्षित साथ लाभेल.

Kanya Rashi | Saam TV

तूळ

महत्त्वाची कामे दुपार पूर्वीच केलेली बरी राहतील. आर्थिक क्षेत्रामध्ये वेगळ्या प्रकारचे धाडस आज करायला हरकत नाही.

तूळ राशी | saam tv

वृश्चिक

बौद्धिक क्षेत्रात आणि शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. व्यवसायामध्ये केलेल्या कामाचे योग्य लाभ मिळण्याचा आजचा दिवस आहे. धन योगाला दिवस चांगला आहे.

Vruchik Rashi Bhavishya | Saam TV

धनु

राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागणार आहेत. आपण ठरवलेल्या गोष्टीविषयी आत्मविश्वास वाढेल. मनोबल चांगले राहील.

Dhanu Rashi | Yandex

मकर

एखादी महत्त्वाची जबाबदारी अंगावर येऊन पडेल. नातेवाईकांचे सहकार्य सुद्धा मिळणार आहे. जवळचे प्रवास होतील.

मकर | Saam Tv

कुंभ

आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील. जुनी येणी सुद्धा वसूल होतील. गुंतवणुकीसाठी दिवस चांगला आहे.

Kumbh Rashi | Saam TV

मीन

आरोग्याच्या तक्रारी कमी होऊन मानसिक स्वास्थ आणि समाधान लाभण्याचा आजचा दिवस आहे. मनासारख्या गोष्टी घडून येणार आहेत.

Meen | Saam Tv

NEXT: श्रीमंत व्हायचंय? मग जाणून घ्या चाणक्यांचे हे ७ नियम, काहीच दिवसात जाणवेल फरक

Ayurveda For Hair | google
येथे क्लिक करा